जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित चर्चगेट येथे रॅली

0

मुंबई । हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडतर्फे 28 जुलै रोजीच्या चर्चगेट येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिपॅथॉन – वॉक फॉर लिव्हर’ या रॅलीच्या दुसर्‍या सत्रामध्ये महाराष्ट्रभरातील 1 हजारहून अधिक औषधशास्त्राचे विद्यार्थी मुंबईत एकत्र आले. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर्स, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट्स आणि यकृततज्ज्ञही यावेळी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.