जागृत राहून वस्तु व सेवा खरेदी करावी

0

शिंदखेडा । ग्राहकांनी जागृत राहून वस्तु व सेवा खरेदी करावी. वस्तु खरेदी च्या वेळी पावती घ्यावी. फसगत झाल्यास ग्राहक मंचकड़े तक्रार नोंदवावी असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेड़ाचे तालुका संघटक प्रा.सी.डी. डागा यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दीना निमित्त येथील एंग्लो उर्दू हाईस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रा.डागा बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. डी. ठाकुर होत्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जी. आर. शेख यांनी केले.

ग्राहकांच्या कर्तव्याची दिली माहिती
प्रा.डागा यांनी जो पैसे देवून वस्तु व सेवा खरेदी करतो व पावती घेतो तो ग्राहक ,ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये सांगून ग्राहक फसवणुकीचे अनेक उदाहरणे सांगितली.20लाख साठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,1करोड़ साठी राज्य आयोग व त्यावरील रकमेच्या तक्रारीसाठी राष्ट्रीय अयोगाकड़े तक्रार नोंदविता येते. त्यासाठी वकील लावन्याची आवश्यकता नाही, साध्या कागदावर मराठी, हिंदी, इंग्रजी मध्ये तक्रार देता येते.विरोधी पक्षकारला लिखित कळविल्यावर2वर्षाच्या आत तक्रार करता येते. ऐ. एस. मोरे, एस. एस. शेख, ऐ. आर. खान, एफ. वाय.शेख उपस्थित होते. उमाकांत सोनवणे यांनी कार्यक्रमसाठी परिश्रम केले.