जागेच्या वादातून एकाचा खून

0

शिरपूर: जागेच्या वादातून 11 संशयितांनी एकत्रित गर्दी करून एकाला लाकडी दंडका व दगडाने मारहाण केल्याने डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हिंंगोणी येथे घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मयत अधिकार आत्माराम पाटील यांना ग्रामस्थांनी उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल केले होते.
सविस्तर असे की, शिरपूर तालुक्यातील हिंगोणी येथील दिनेश अधिकार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव रस्त्यालगत असलेल्या खळ्याची व गोठ्याच्या जागेवरून 24 एप्रिल रोजी वाद झाल्याने संशयित शिवाजी विनायक पाटील, गोकुळ विनायक पाटील, निलेश ज्ञानेश्वर पाटील, लोटन विक्रम पाटील आदींनी एकत्र येत अधिकार आत्माराम पाटील, चतुर साहेबराव पाटील व फिर्यादी दिनेश अधिकार पाटील यांना संशयितांनी एकत्रित गर्दी करून शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्याने, दगडाने, हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या वडिलांना उचलून खाली जमिनीवर आपटल्याने डोक्याचे मागील बाजुस व बरगडीजवळ मार लागला. फिर्यादीच्या वडीलांचा 25 रोजी सकाळी 7 ते 7:30 वाजेपूर्वी मृत्यू झाल्याची फिर्याद दिल्यावरुन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.