भुसावळ- तालुक्यातील जाडगाव येथील रेल्वे गेट बंद करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाने भुयारी पुलाची उभारणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रहिवाशांना ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. जाडगाव व महामार्ग यांच्यामधून भुसावळ-नागपूर रेल्वे मार्ग जात असल्याने या ठिकाणी रेल्वेचे गेट लावण्यात आले आहे. हे गेट 24 तास उघडे असायचे परंतु गेल्या काही वर्षांपासून हे गेट फक्त बारा तास उघडे करण्यात येत होते. उर्वरित बारा तास हे गेट बंद असल्याने गैरसोय होत होती. नागरीकांना पर्यायी रस्ता म्हणून बाजूलाच असलेल्या नाल्यातील पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पुलाखाली बाजूने ये-जा करावी लागत होती परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथे पाणी साठल्याने चिखल असायचा यामुळे येथून जाणे-येणे अडचणीचे ठरत होते. या गावातील नागरीकांसाठी व मानवरहित गेट बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जाडगाव गावाजवळ भुयारी पुलाची उभारणी सुरू केली आहे यामुळे येथील नागरीकांना सुविधा उपलब्ध होणार असून याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.