जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी नंदुरबारला आमरण उपोषण

0

नंदुरबार :-  येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाज समनव्य समितीच्या वतीने 14 मे पासून  आमरण उपोषण धरणे आंदोलनास सुरवात करण्यात आली. आदिवासी टोकरे कोळी समाजाला सुलभरीत्या जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभरातील विविध जात पडताळणी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार येथे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे,.