भुसावळ- तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली शशिकांत पाटील यांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी 3 डिसेंबर रोजी अपात्र केले आहे. 2015 मध्ये खंडाळा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती तर राखीव प्रवर्गातून वैशाली पाटील या 7 ऑगस्ट 2015 रोजी निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे सरपंचांना बंधनकारक असतानाही त्यांनी 6 फेब्रुवारी 2016 दरम्यानच्या काळातही सादर न केल्याने व सहा महिन्यांची मुदत निघून गेल्याने खंडाळा येथील शंकर नामदेव पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार नोंदवली होती. जिल्हाधिकार्यांनी सरपंच वैशाली पाटील यांना 3 डिसेंबर रोजी अपात्र ठरल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.