जातीभेद मिटल्यास समाज गुण्यागोविंदाने नांदतील

0

भुसावळ : समाजात जो भेद मरणापर्यंत प्रचलित आहे तो फक्त जातीभेदच आहे व हा भेद मिटल्यास सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदतील, असे प्रतिपादन अ‍ॅड. कोमल खैरनार यांनी केले. कोटेचा महिला महाविद्यालयाच्या रासेयो हिवाळी शिबिराप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी जातीमुक्त भारत समृध्द भारत या विषयावर मार्गदर्शन करतांना प्रज्ञा व प्रजा तसेच ईश्‍वर व धर्म या संकल्पना उदाहरणाद्वारे स्पष्ट करुन जातीयता कशी फोफावत आहे व ती कशी कमी करता येईल यामुळे होणारा र्‍हास व युवकांचे योगदान या विषयावर प्रबोधन केले.

निसर्ग संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य
यानंतरच्या सत्रात वन्यजीव संरक्षक बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकारी अधिकारी सतिश कांबळे यांनी सर्व वन्यजीवांचे संवर्धन करुन सृष्टीचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. प्रत्येक जीव, वृक्ष, प्राणी या पर्यावरणात आपले काम चोख बजावत असतात. भारतीय घटनेनेसुध्दा आपल्या निसर्गाचे संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.

कॅशलेसबाबत प्रोत्साहन
शेवटच्या दिवशी एडस् निर्मुलनबाबतीत जनजागृती करण्यासाठी रेड रिबन एक्स्प्रेस ओढण्या घेवून दिंडी स्वरुपात गावातून काढण्यात आली. सरपंच सुमन वाघ यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली. तसेच नोटबंदीविषयी गावातील नागरिकांचे मत जाणून घेतले व कॅशलेस व्यवहार करण्यासंबंधी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. प्राचार्य डॉ. डी.जी. भोळे, उपप्राचार्य प्रा. सी.जे. धनवीच यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा. सचिन पंडीत, प्रा. गिरीश कोेळी, नितीन चौधरी, लिलाधर मिस्त्री, निलिमा पाटील यांनी परिश्रम घेतले.