शेंदुर्णी । येथील गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर 24 जानेवारीपासुन गोंदेगांव ता.जामनेर येथे सुरू होते. याकाळात विदयार्थ्यांनी श्रमदानाने संपुर्ण गावाची साफसफाई करण्यात आली. मंगळवार 30 जानेवारी रोजी शिबीरांचा सांगता समारोह करण्यात आला. त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणुन सहा. पो.निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, पो.हे.कॉ. मनोहर पाटील, भिकन तडवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी.गवारे यांची उपस्थीती लाभली.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत: अध्यक्षीय समारोप भाषण करतांना प्राचार्य वासुदेव पाटील यांनी बार्डर सर्जिकल, नोटबंदी सर्जिकलनंतर आता प्रधानमंत्र्यानी जात विरहीत समाज निर्मीतीसाठी सर्जिकल स्ट्राईक होणे जरुरी असल्याचे सांगुन शाळेच्या दाखल्यावरुन जातीचा उल्लेख नष्ठ करुन मानव जात हि एकच जात निर्मान करुन जातीपातीच्या दर्या संपवुन मानवता समाज निर्मान होने जरुरी आहे. त्या दिशेने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थीनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन जगदीश पाटील, माधुरी भदाणे, चेतन गुजर यांनी केले व प्रा. दिनेश पाटील यांनी आभार मानले.