18 क्विंटल कापसासह ट्रक चालकाने ठोकली धूम ; प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीचा प्रयत्न
बोदवड- दोनशे रुपये जास्तीचा भाव देवून तालुक्यातील वरखेड येथील कापूस उत्पादकांना गंडवू पाहणार्या जामनेर तालुक्यातील व्यापार्यांचा डाव सतर्क शेतकर्यांनी उघडा पाडला. शेतकर्यांचा रूद्रावतार पाहून ट्रक चालकाने 18 क्विंटल कापूस घेत धूम ठोकली तर सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रकरणात तडजोड करण्यासाठी काहींनी प्रयत्न चालवले होते.
जादा भावाने शेतकर्यांना गंडवले
कापसाला पाच हजार 300 रुपये भाव दिला जात असताना जामनेर तालुक्याील कालू शेठ, सत्तार शेख, रीयाज शेख या व्यापार्यांनी तालुक्यातील वरखेडच्या शेतकर्यांना या भावापेक्षा प्रत्येकी क्विंटलमागे 200 रुपये जादा भाव देण्याचे आमिष देत शेतकरी विनोद बोरले, सोपान पाटील, राजेश बोरले, विष्णू नेहते रोहित पाटील, गणेश भोळे, भास्कर टेकडे, शंकर चौधरी, नारायण कराड, गजानन कदम, निवृत्ती चौधरी, संजय बोडके या शेतकर्यांकडील कापसाची खरेदी केली. मात्र व्यापार्यांच्या काट्यात फॉल्ट झोल असल्याचा संशय निवृत्ती वसंत चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व्यापारी व मापाडीत हुज्जत घातल्याने शेतकरीही संतप्त झाले. चौधरी यांनी यापूर्वीच आपला कापूस मोजल्याने ते वजन व्यापार्याकडे मोजण्यात आल्यानंतर आलेल्या वजनात तफावत आढळल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. दरम्यान, फसवणूक झालेले शेतकरी रात्री उशिरापर्यंत बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी थांबून होते तर प्रकरण मिटवण्यासाठी काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रत्न चालवला होता. दरम्यान, अशा व्यापार्यांवर कठोर कारवाई काळाची गरज असून त्याचा परवाना रद्द व्हायला पाहिजे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्त पाटील यांनी सांगत कापूस व्यापारी परधानाधारक असल्याचे निष्पन्न झाल्यास बाजार समितीदेखील कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.