जाधव परिवारातर्फे एक लाख रुपयाचा निधी

0

शहादा। येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक क्षत्रिय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्याम जाधव व विजय दिनकर जाधव यांनी जाधव परिवाराच्यावतीने राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग असावा म्हणून सुमारे एक लाख रुपयाचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे.

श्‍याम यादव यांनी मदतीच्या निधी एक लाखाचा धनादेश प्रांत अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी कार्यालयात ईश्वर पाटील, तालुका मंडळ अधिकारी अमृतकर उपस्थित होते. प्रांत अधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी जाधव परिवाराचे मदतीबाबत कौतुक केले. काेराेनाबाबत देश संकटात आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडली असून आर्थिक घडी विस्कटली आहे. सारेच काही ठप्प झालेले आहे. देशाची आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी देशातील नागरिकांनी, उद्योजक, उद्योगपती, विविध सेवाभावी संस्था, संघटना साऱ्यांनीच मदत करावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले होते. हे राष्ट्रीय संकट असून राष्ट्राला उभारण्यासाठी योगदान महत्त्वाची राहील म्हणून देशभरातून मदतीच्या आर्थिक ओघ सुरू झाला. आपले ही राष्ट्रीय कार्यात योगदान असावे म्हणून श्याम जाधव यांनी एक लाखाचा धनादेश मदतीसाठी दिलेला आहे. जाधव परिवार हा शहादा शहरात सेवाभावी परिवार म्हणून परिचित आहे.