अमळनेर । तालुक्यातील जानवे येथील शेतकरी गोकुळ सुपडु पाटील (वय 65 ) यांनी मंगळवार, 14 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कर्जबाजारी झाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
2 लाख 30 हजारांपायी मृत्यूला कवटाळले
याबाबत असे की मयत गोकुळ सुपडु पाटील वय 65 रा.जानवे यांच्यावर विकासोचे कर्ज 80 हजार स्थानिक पतसंस्था 50 हजार व हात उसनवारी सुमारे 1 लाख घेतले होते. त्यांनी त्या कर्जाला कंटाळून जानवे येथील राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार 15 रोजी सकाळी 9 वाजता जानवे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.