जान्हवीचा दिलखुलास अंदाज

0

मुंबई – जान्हवी कपूर म्हंटले की ‘धडक’ हा सुपरहिट चित्रपट आठवतो. स्टारकीड असूनसुद्धा जान्हवीने दाखवून दिले कि ती स्वतःच्या मेहनतीने काम करू शकते आणि बॉलीवूड मध्ये स्वतःची एक वेगळी जागा निर्मण करू शकते. अभिनयापाठोपाठच तिच्या मनमोहक अदांचा जलवाही आता प्रेक्षकांचे विशेष लक्ष खेचत आहेत. मुंबईमध्ये नुकतेच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये हे दिसून आले.

मुंबई येथे आयोजित फॅशन शोमध्ये जान्हवी फॅशन शो ची शो-स्टॉपर म्हणून आत्मविश्वासाने आणि अतिशय दिलखुलास अंदाजाने उतरली होती. या लूकमध्ये जान्हवी एका सुपर मॉडेलपेक्षा कमी दिसत नव्हती. यावेळी जान्हवी निळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसवरील गुलाबी आणि सोनेरी रंगाची काठ लक्ष आकर्षित करत होती. या लॅकमे फॅशनवीकची सुरूवात २२ ऑगस्टला झाली असून २६ ऑगस्टपर्यंत ते सुरू असणार आहे.