जाब विचारणार्‍याची हत्या

0
भोसरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा जाब विचारणार्‍याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी आकाश गिरी (वय 20,रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. दयाराम गिरी, बाबुराव गिरी व जयप्रकाश गिरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून फिर्यादीची आई व आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे वडील आरोपींकडे गेले होते. परंतु फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकूने वार करून यातील आरोपीनी त्यांना जीवे मारले. यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.