जामठीत नकली बीडी विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा

0

बोदवड- तालुक्यातील जामठी गावातील त्रिमूर्ती प्रोव्हीजन या दुकानात नकली उंट बीडी विक्री करीत असल्याचे आढळल्याने संशयीत आरोपी सुरेश रूपा साठे यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कंपनीचे गुडवील धोक्यात येवून ग्राहकांची फसवणूक होत असल्याने कंपनीच्या मालाच्या विक्रीकर परीणाम होत असल्याने उंट बीडी कंपनीचे मालक हसनलाल सारडा यांचे ट्रेड मार्क, पुष्ट व सील पट्टी, झिल्ली नकली वापरून सरकारी उत्पन्न बुडून नकली बिडीची विक्री केल्याचे आढळल्याने गौतम पुंजाजी अहिर (नाशिक, पुणे रोड) यांच्या फिर्यादीवरून दुकान मालक सुरेश साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दुकानातून दोन हजार 94 रुपयांचा बीडी साठा जप्त करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे करीत आहेत.