पिंपरी-चिंचवड :– जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधील वाकड गावातील मातंग समाजातील युवकांना विहिरीत पोहल्याबद्दल त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. या झालेल्या अत्याचार प्रकरणीबद्दल येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे केली. या अत्याचारप्रकरणी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ सर्व पक्षीय व सर्व दलित संघटनांच्या वतीने प्रश्नी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात यांची होती उपस्थिती
यावेळी अक्षदा नरेश करासिया या आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, नगरसेविका झुंबर शिंदे, नगरसेवक उत्तम हिरवे, नगरसेवक अरूण टाक, काँग्रेस मावळ लोकसभा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, धुराजी शिंदे, बबन साके, मनोज तोरडमल, दशरथ कसबे, युवराज दाखले, भगवान शिंदे, नाना कसबे, राजु आवळे, राज नायर, सुनील भिसे, बापु वाघमारे, विठ्ठल कळसे, दीपक चकाले, तानाजी साठे, अविनाश कांबेकर, विशाल कसबे, अण्णा कसबे, पांडुरंग लोखंडे, महेंद्र सोनवले, गणेश अडागळे, बाळासाहेब खंदारे, निता वाल्मिकी, संदीप जाधव, सतिश भवाळ, श्रावण बगाडे, रेशमा पारधे, तुकाराम उदगीरे, वाल्मिकी समाज अध्यक्ष राजू परदेशी, साहित्य रत्नलोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीमहोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप आदी उपस्थित होते.