जामनेरच्या शाळेत दोन हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

0

जामनेर। जामनेर तालूका एज्युकेशन सोसायटीला स्वार्थी राजकारणाचा कलंक लागू पाहत असून सस्थेंसह सद्य परिस्थीतीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्यच टांगणीला लागलेले असल्याचे चित्र संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या संचालक मंडळाच्या वादातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संस्थेत उघडपणे दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहे. मुख्याध्यापक सचीव व मुख्याध्यापक अध्यक्ष गटाचा असे दोन गट पडले आहे.

सचिव सुरेश धारिवाल दोन दिवसांपुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक बी.आर.वले यांना स्टॉक रुमची चावी मागीतली असता त्यांनी पदभार नसल्याने देण्यास नकार दिला. वादामुळे वळपास दोन हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहणार आहे. र्थ्यांना पोषण आहारापासून वंचित रहावे लागले. यावर संचालक सुरेश धारिवाल, पारस ललवाणी, सचिन बसेर, दिलीप महाजन, तसेच सस्थेंचे अध्यक्ष आबाजी पाटील यांचे नातू मुलगा जितेंद्र पाटील यांनी तातडीने बैठक बोलावली.