जामनेरप्रमाणेच वरणगावचाही होणार विकास

0

साधना महाजन ; वरणगाव शहरात समाज मंदिराचे उद्घाटन

भुसावळ- वरणगाव नगरपरीषदेने 62 लाख रुपये खर्चून बुद्ध विहार बांधून समाजासाठी उपलब्ध करून दिला आहे. वरणगाव शहरात एका वर्षात 14 कोटी रुपयांची विकासकामे झाली असून वरणगाव शहर हे विकासकामांच्या बाबतीत जामनेरच्या बरोबरीला राहील, असे मत जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी येथे व्यक्त केले. वरणगाव शहरातील नगरसेविका माला मेढे यांच्या प्रभाग 17 मध्ये नगरपरीषदेच्या वतीने बांधलेल्या बुद्ध विहाराचे उद्घाटन महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
माजी मंत्री आमदार संजय सावकारे, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शे.युसूफ, शीतल दत्तू सोनवणे, संध्या जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, शशिकला महाजन, वरणगावच्या नगरसेविका माला मेढे, नसरीनबी सजीत कुरेशी, मेहनाजबी ईरफान पिंजारी, प्रतिभा चौधरी, नगरसेवक गणेश चौधरी, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, कामगार नेते मिलिंद मेढे, संजीव कोलते आदींची उपस्थिती होती.

विकासासाठी निधी देणार -महाजन
साधना महाजन म्हणाल्या की, वरणगाव शहरात सुरू असलेली विकासाची कामे उल्लेखनीय असून इतर शहरांना आदर्श निर्माण करणारी आहेत. वरणगाव शहरातील विकासकामांसाठी भरीव निधी शासनाच्या माध्यमातून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांकडून उपलब्ध करून देतील, अशी ग्वाहीदेखील महाजन यांनी प्रसंगी दिली.

विहाराचा चांगल्या कामासाठी वापर व्हावा -आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, वरणगाव नगरपालिकेने मागासवर्गीय बांधवांसाठी एक चांगला आदर्श बुद्ध विहार बांधून दिला असून त्याचा चांगल्या कामासाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत यापुढेही जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले.