जामनेरमध्ये ज्वारी-मकाला खरेदी केंद्राचा शुभारंभ

जामनेर – शासकीय ज्वारी-मका खरेदी केंद्राचा शुभारंभ भाजप नेत्या तथा नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजीत कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष आणी शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बावीस्कर, उपसभापती बाबुराव गवळी, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे,जे के चव्हाण,तुकाराम निकम, विलास पाटील,बाबुराव घोंगडे,अमर पाटील,डॉ प्रशांत भोंडे,निलेश चव्हाण,सरचिटणीस रवींद्र झाल्टे, दिपक तायडे,छोटु सपकाळ, संदिप शिंदे,गोपाळ पाटील आदी पदाधीकारी-कार्यकर्ते-शेतकरी मोठ्या संख्येने होते.शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी २७३८ तर मका १८७० प्रती क्विंटल दराने खरेदी करण्यात येईल,तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.