जळगाव। जिल्ह्यातील जामनेर व पाचोरा तालुक्यातील सुनसगाव /भराडी लघु पाटबंधारे प्रकल्प, पाळधी साठवण तलाव, शेंदुर्णी शामसिंह बुआ प्रकल्प, चिंचखेडा पुनर्वसन, सुर प्रकल्प कापूसवाडी, लोंढरी,पिंपळगाव कमानी प्रकल्प, पहूर सांगवी प्रकल्प व घोडसगाव लघुपाटबंधारे प्रकल्प, ता.पाचोरा येथील शेकडो प्रकल्पग्रस्ताच्या गेल्या अनेक वर्षंपासून संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला अद्याप त्यांना मिळालेला नव्हता. याबाबत कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग जळगाव व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा तडजोडीचा प्रस्ताव तयार होता. तरीही गेल्या अनेक वर्षंपासून शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यामुळे ते हलाखीचे जीवन जगत होते. बरेचशे शेतकरी विधवा महिला व सहारा नसलेले वृद्ध होते. प्रकल्प तडजोड प्रस्ताव मंजूर होण्यासाठी शेंदूरणीचे संजय गरुड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार तसेच जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करून रक्कम मंजूर करून आणली. ती जवळपास 100 कोटींच्यावर आहे. या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.