जामनेरात निर्विवाद कमळाचे वर्चस्व

0

मंत्री गिरीश महाजनांची चालली जादू ; नगराध्यक्षपदी साधना महाजन विजयी

जामनेर– जामनेर पालिकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जादू चालली असून संपूर्ण पॅनल भाजपाचे विजयी झाल्याने भाजपाच्या गोटात आनंदाची लहर पसरली आहे. विशेष म्हणजे प्रथमच अशा पद्धत्तीने जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने नावालाही एकही विरोधक निवडून आला नाही हे विशेष तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या आठ हजार 418 मतांनी निवडून आल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रा.अंजली उत्तम पवार यांचा पराभव झाला. 24 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संजय गरूड व पारस ललवाणी यांना जामनेरकरांनी नाकारले आहे.

इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता
जामनेर पालिकेच्या निवडणुकीत जामनेरकरांनी प्रथमच भाजपाला एकहाती सत्ता दिली आहे तर आतापर्यंत पालिकेवर तिसर्‍यांदा भाजपाने कमळ फुलवले आहे. जामनेर पालिकेत भाजपाची ताकद वाढल्याने जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांचेही वजन वाढले आहे.