जामनेर तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

पहूर : जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेचा विनयभंग करीत पीडीत विवाहितेच्या पतीला छताच्या भिंतीवर ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा पती जखमी
जामनेर तालुक्यातील एका गावात विवाहिता ही आपल्या पती व मुलीसह वास्तव्यास असून सोमवार. 25 एप्रिल रोजी विवाहिता ही घराच्या छतावर पती व मुलगी यांच्यासोबत झोपलेली असतांना गावातील संशयीत आरोपी राहुल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे हा विवाहितेजवळ झोपलेल्या ठिकाणी आला व त्याने विनयभंग केला. विवाहितेला जाग आल्यावर तिने आरडाओरड करताच पतीही उठला व त्याने संशयीत आरोपीला जागीच पकडले. मात्र आरोपी शुभम सोनवणे याने विवाहितेच्या पतीला जोराचा धक्का देवून छताच्या भिंतीवर पडल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी विवाहितेने पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी राहुल उर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार हंसराज मोरे करीत आहे.