जामनेर । तालूक्यातील 10 ग्रामपंचायतीची मुदत नोव्हेंबर 2017 व डिसेंबर 2017 या कालावधीत खालील ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या गावातील नागरीकांना आता निवडणूकीचे वेध लागले आहेत. निवडणूक घोषित झालेली 10 गावे अशी पळासखेडे बुद्रूक, चिंचखेडे बुद्रूक, हिंगणे बुद्रूक, खादगाव, करमाड, रांजणी, मोहाडी, टाकळी खुर्द, कोदोली, चिलगाव, मुख्य पक्षाकडून उमेदवार चाचपणीला सुरूवात झालेली आहे. लोकनियुक्त सरपंचपदासाठी उत्सुकता – येत्या निवडणूकी पासून सरपंच पद हे थेट जनतेमधून निवडून येणार असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाने काढला आहे. उदाहरणार्थ ज्या ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य आहेत त्यातूनच 1 सदस्य सरपंचपदासाठी उमेदवारी करेल कि दहावा सदस्य हा उमेदवारी करेल हे स्पष्ट होत नसल्यामुळे लोकनियुक्त सरपंच पदासाठी नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
घोडे बाजाराला बसणार लगाम
या अगोदर निवडूण आलेल्या सदस्या मधूनच सरपंच निवडला जायचा ज्या पक्षाच बहूमत जास्त त्याच पक्षाचा सरपंच व्हायचा. बहूमत सिध्द करण्यासाठी वेळेवर सदस्याची पळवा पळवी केली जात होती.त्यातून आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार होऊन घोडे बाजार व्हायचा.पंरतू लोकनियुक्त सरपंच निवडीचा निर्णय घेऊन शासनाने या घोडे बाजाराला जणू काही लगामच लावल्याचे दिसून येत आहे.
निवडीचा कार्यक्रम याप्रमाणे
निवडणूक कार्यक्रम जाहीर 7 सप्टेंबरला नोटीस प्रसिध्द करणे, 15 ते 22 सप्टेंबर सकाळी 11 ते 4ः30 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करणे. 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्र छाननी,27 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघार, 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादि जाहीर, 7 ऑक्टोबरला सकाळी 7:30 ते सांयकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया व 9 ऑक्टोबला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणी व निकाल जामनेर येथे वाकी रोडवरील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात तात्पुरत्या स्थलांतर झालेल्या नवीन तहसील कार्यालयात पार पाडण्यात येणार असल्याची माहीती तहसिलदार नामदेव टिळेकर यांनी दिली आहे.