प्रांताधिकार्यांना निवेदन ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
भुसावळ- जामनेर येथील ‘दैनिक लोकमत’चे पत्रकार लियाकतअली सैय्यद यांच्यावर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करून तेथील भाजप नगरसेवक पुत्र व त्याच्या सहकार्यांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडच्या सहाह्याने भ्याड हल्ला केल्याप्रकरणी मंगळवारी भुसावळ तालुक्यातील पत्रकारांनी घटनेचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन दिले. आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना या पत्रकारांची उपस्थिती
भुसावळ तालुका पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, मोना वाघमारे (देशदूत), हेमंत जोशी, श्रीकांत सराफ (दिव्य मराठी), गणेश वाघ (जनशक्ती), उत्तम काळे, वासेफ, पटेल, सुधीर पाटील, सुमित निकम, छायाचित्रकार श्याम गोविंदा, हबीब चव्हाण (लोकमत), शिरीष सरोदे, छायाचित्रकार इक्बाल खान (सकाळ), संतोष माळी (तरुण भारत), प्रेम परदेशी, किशोर शिंपी (देशोन्नती), विवेक ओक (लोकमत टाईम्स), उज्ज्वला बागुल (सामना), अनिल सोनवणे (आव्हान), छायाचित्रकार गोपाल म्यांद्रे आदींची उपस्थिती होती.