भुसावळसह यावल व फैजपूरला प्रशासनाला निवेदन ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी ; लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले खपवून घेणार नाही ; पत्रकारांनी दिला ईशारा
भुसावळ- जामनेर येथील ‘दैनिक लोकमत’चे पत्रकार लियाकतअली सैय्यद यांच्यावर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करून तेथील भाजप नगरसेवक पुत्र व त्याच्या सहकार्यांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडच्या सहाह्याने भ्याड हल्ला केल्याप्रकरणी मंगळवारी भुसावळ विभागातील भुसावळसह यावल व फैजपूरला निषेध करण्यात आला. प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला.
भुसावळात प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ- तालुक्यातील पत्रकारांनी घटनेचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन दिले. प्रसंगी भुसावळ तालुका पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, मोना वाघमारे (देशदूत), हेमंत जोशी, श्रीकांत सराफ (दिव्य मराठी), गणेश वाघ (जनशक्ती), उत्तम काळे, वासेफ, पटेल, सुधीर पाटील, सुमित निकम, छायाचित्रकार श्याम गोविंदा, हबीब चव्हाण (लोकमत), शिरीष सरोदे, छायाचित्रकार इक्बाल खान (सकाळ), संतोष माळी (तरुण भारत), प्रेम परदेशी, किशोर शिंपी (देशोन्नती), विवेक ओक (लोकमत टाईम्स), उज्ज्वला बागुल (सामना), अनिल सोनवणे (आव्हान), छायाचित्रकार गोपाल म्यांद्रे आदींची उपस्थिती होती.
यावल तहसीलदारांना निवेदन
यावल- गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा हा निंदणीय प्रकार आम्ही कदापी सहन करणार नाही. हल्लेखोरांवर हक्क संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ यावल तालुक्याच्या वतीने यावलचे तहसीलदार कुंदन हिरे व पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे यावल तालुकाध्यक्ष प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष किरण माळी, सचिव महेश पाटील, सचिन नायदे, चंद्रकांत नेवे, खुशाल पाटील, ज्ञानेश्वर कोळी, के.बी.खान, याकूब पिंजारी, किशोर नेमाडे, शब्बीर खान, लतीफ तडवी, गोकूल तायडे, शे. फरिद शे. वाहेद आदी पत्रकार उपस्थित होते.
हल्ल्याचा काळ्या फिती लावून निषेध
फैजपूर- भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सावदा-फैजपूर येथील पत्रकारांनी काळ्या फिती लावून फैजपूर येथील सुभाष चौक ते प्रांत कार्यालय असा पायी चालत मोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. प्रांताधिकारी व सावदा सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कमिटीतर्फे महासचिव हिरालाल लोथे यांनी पत्रकारांच्या मागणीला जाहीर पाठींबा दिला. निवेदन देताना सावदा येथील आत्माराम तायडे, जितेंद्र कुलकर्णी, प्रवीण पाटील, शामकांत पाटील, लाला कोष्टी, पंकज पाटील, साजीद शेख बाबू, राजेंद्र दीपके, रवींद्र हिवरकर, दीपक श्रावगी, कैलास परदेशी, कैलास लवंगडे, राजेंद्र भारंबे, सुनील चोपडे, राजेंद्र पाटील, युसुफ शहा, फैजपूर येथील उदय उर्फ आप्पा चौधरी, समीर तडवी, शेख फारुख शेख अमीर, नंदकिशोर अग्रवाल, हिरालाल लोथे, राजू तडवी, सलीम पिंजारी, मयूर मेढे, वासुदेव सरोदे, निलेश पाटील, जावेद काझी, प्रा.उमाकांत पाटील, भारत हिवरे, जितेंद्र कुलकर्णी, शेख कामील, इदू पिंजारी, विकास वाणी, संजय सराफ, अरुण होले, राजेंद्र तायडे हे उपस्थित होते.