पोलिसांनी केली कारवाई
जामनेर: राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे.तसेच कलम १४४ अंतर्गत संचार बंदी घातली आहे. या काळात शहरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना फक्त पोलिसांकडून लाठीचा प्रसाद किंवा शिक्षा दिली जात होती. परंतु शनिवार पासून पोलिस प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात केली असून विनाकारण गाडी घेऊन फिरणाऱ्या व नियंम मोडणाऱ्या व्यक्तीना २०० रुपये दंड वसूल केला जात आहे.
लॉकडाऊन संपेपर्यंत मोटरसायकल ताब्यात
टाळेबंदी असे पर्यंत मोटार सायकल जप्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईला नागरिकांनी सामोरे जाण्यापेक्षा घरात राहून सर्वांची काळजी घ्यावी असे पोलिस प्रशासनाने आवाहन केले आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शननुसार प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे.
अनेकांनी रस्त्यावर फिरणे टाळले
पोलिसांकडून होत असलेल्या दंडात्मक कारवाई होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर येणे टाळले. या वेळी तहसीलदार अरुण शेवाळे , मुख्याधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.