वरणगाव:- जामनेर नगरपालिकेत संपूर्ण पॅनल भाजपाचे विजयी झाल्याने शहरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाने बसस्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेटे वाटप करून जल्लोष केला. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.बापू जंगले, माजी सरपंच बंडू जंगले, नगरसेवक बबलू माळी, कामगार नेते मिलिंद मेढे, इरफान पिंजारी, साजीद कुरेशी, अजय पाटील, प्रवीण ढवळे, सुकलाल धनगर, राजेंद्र गुचळ, नामदेव मोरे, शामराव धनगर, ज्ञानेश्वर देवघाटोळे, कुंदन माळी, संदीप माळी, आकाश निमकर, तेजस जैन, सोहेब कुरेशी, हिरामण चौधरी, चेतन माळी, धीरज माळी, टिनू माळी, प्रकाश चौधरी, संतोष नारखेडे, प्रशांत मोरे, किशोर सोनार, सचिन मेथाळकर, हितेश चौधरी, शेरू माळी आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.