जामनेर शहरातून चोरट्यांनी गोर्‍हे लांबवले

Farmers take care of livestock : Two bullocks were sent from Jamner जामनेर : जामनेर शहरातील आठवडे बाजार परीसरात वाहनातून आलेल्या सात ते आठ चोरट्यांनी 40 हजार रुपये किंतमीचे दोन गोर्‍हे लांबवले. तिसरा गोर्‍हा चोरत असतांना अचानकपणे गुरे मालकाला जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

गुरे चोरट्यांची टोळी सक्रिय
जामनेर शहरातील आठवडे बाजार परिसरात बांधलेले गोर्‍हे चोरण्यासाठी बुधवार, 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका वाहनातून सात ते आठ जण अनोळखी चोरटे आले. त्यांनी सुरूवातील दोन गोर्‍हे वाहनात कोंबले. त्यानंतर तिसरा गोर्‍हा वाहनात कोंबत असतांना मालक निसार अहेमद अब्दुल रशीद (34, चाळीस मोहल्ला, जामनेर) यांच्या लक्षात आल्याने धाव घेतली. त्यानंतर त्याच परिसरात राहणारे इतर जाहीरबेग जालील बेग व जावेद इकबाल मुल्लाजी रा. चाळीस मोहल्ला, जळगाव यांनी देखील धाव घेतली. हे पाहून चोरटे वाहनातून पसार झाले. याप्रकरणी निसार अहेमद अब्दुल रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.