जामीन अर्ज फेटाळला

0

पुणे । सोबत न राहता बुधवार पेठेत जाऊन वेश्या व्यवसाय करणार्‍या मैत्रिणीच्या हत्याप्रकरणातील सुखदेव रामदास मडावी या तरुणाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी हा आदेश दिला आहे. ही घटना 23 मे 2017 रोजी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेत घडली होती.

सुखदेव याने बिथी राहामाना मोल्ला (वय 24, रा. वडारवाडी) या तरुणीची हत्या केली होती. सुखदेव मडावी आणि मृत बिथी हे पूर्वी एकत्र राहत असत. त्यानंतर काही काळाने बिथी हिने सुखदेव सोबत राहणे सोडले आणि बुधवार पेठेत जाऊन वेशाव्यवसाय करू लागली. याचा राग आल्याने आरोपीने तिच्या पोटात छातीवर चाकूने वार करून बिथी हिचा खून केला होता.

सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन मिळविण्यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध करत जामीन मिळाल्यास आरोपी पळून जाऊ शकतो अथवा पुराव्यात छेडछाड करू शकतो असा युक्तिवाद केला होता. अ‍ॅड. सप्रे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत मडावी याचा जामीन अर्ज फेटाळला.