जालन्यात संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात घोषणाबाजी; पोलिसांकडून लाठीमार

0

जालना-शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथील कार्यक्रमात आज रविवारी संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी गोंधळ घातला आहे. जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांची बैठक होती. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळी कार्यक्रमस्थळी या संघटना आल्या आणि त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. संभाजी भिडेंना शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अज्ञातस्थळी नेल्याचेही सांगण्यात येते.