जावळे परीवाराने केले मयताचे अवयव दान

0

*अवयवदानाने वाचू शकतात एखाद्याचे प्राण
*भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे परीवाराचा निर्णय

भुसावळ । भाजपाचे सुधाकर जावळे यांच्या पुतण्याच्या पत्नीचे सोमवारी किरकोळ आजाराने निधन झाले.मात्र अशा दुखद प्रसंगीही जावळे परीवाराने स्वत:ला सावरत मयताचे किडनी व लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या या निर्णयामूळे एखाद्या गरजू रूग्णांचे प्राण वाचू शकतात.त्यामूळे त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सुधाकर जावळे यांचे पुतणे सागर कडू जावळे यांची पत्नी प्रियंका (वय २५) यांची महीनापुर्वी प्रसुती होवून त्यांना एक मुलगी झाली .मात्र प्रियंकाची व मुलीची तब्येत खराब झाल्याने त्यांना महीनाभरापुर्वी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते.मात्र यानंतर पुन्हा प्रियंकाची तब्येत खराब झाल्याने त्यांना पुन्हा डॉ.हेगडेवार व माणिक अशा खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.यामध्ये दोन दिवसापुर्वी मेंदुची शस्त्रक्रीयाही झाली होती.मात्र सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.यामूळे जावळे परीवार व प्रियंकाचे वडील रविंद्र वाघोदे यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला.मात्र असे असतांनाही त्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाने प्रियंकाची किडनी व लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामूळे एखाद्या गरजू रूग्णांचे प्राण वाचू शकत असल्याने जावळे परीवाराच्या या निर्णयाचे दुखद प्रसंगीही कौतूक व्यक्त होत आहे.

तिन वर्षापुर्वी झाले होता साखरपुड्यातच विवाह
सुधाकर जावळे यांच्या पुतण्या सागर जावळे याचा तिन वर्षापुर्वी कंडारी येथील रविंद्र नामदेव वाघोदे यांच्या प्रियंका या मुलीशी साखरपुड्यातच आदर्श पद्धतीने विवाह झाला होता.प्रियंकाचे शिक्षण दहावी पर्यंत झाले असून वडील रेल्वेत नोकरीला आहेत.यामूळेही जावळे परीवाराचे कौतूक झाले होते.मात्र काळाने त्यांच्यावर दुखाचा डोंगर उभा केला.

डॉक्टर मित्र मंडळीचाही घेतला सल्ला
प्रियंकाच्या निधनानंतर जावळे व वाघोदे परीवाराने प्रियंकाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्यांनी डॉक्टर मित्र परीवारातील डॉ.विनोद चौधरी ,डॉ.निलेश किनगे,डॉ.विलास भोळे,व अतूल झांबरे यांचे अवयव दानाच्या बाबतीत मार्गदर्शन घेतले.त्यानूसार प्रियंकाचे अवयव अत्यंत गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी अवयवाचे औरंगाबाद येथील रूग्णालयातच दान केले.यामूळे एखाद्या गरजू व्यक्तीला जिवदान मिळण्यास मदत होणार असल्याचे समाधान जावळे परीवारामध्ये झाले आहे.