ऑल इंडीया राईन बागवान कॉन्फरन्सतर्फे पुरस्काराचे वितरण
नंदुरबार – येथील क्रीडा शिक्षक जावेद अजिज बागवान यांना पुणे येथे ऑल इंडीया राईन बागवान कॉन्फरन्सतर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल इकबाल खलिल राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार गेल्यावर्षी महेंद्रसिंग धोनी यांनाही देण्यात आला होता. तर यावर्षी नंदुरबार येथील जावेद बागवान यांना देण्यात आला. रांची येथील स्टील प्लांटचे माजी अधिकारी तथा क्रीडाप्रेमी स्व.इकबाल खलिल राईन बागवान यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो.
ऑल इंडीया राईन बागवान ट्रस्ट, पुणे व इकबाल खलिल ट्रस्ट, रांची यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे ऑल इंडीया राईन कॉन्फरन्सतर्फे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले.यावेळी माजी केंद्रीय मंत्री सी.एम.इब्राहीम, आजम कॅम्पसचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, इकलाब खलिल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अरशद इकबाल, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते माजी निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान, अधिवेशनाचे संयोजक सलिम बागवान, अध्यक्ष हाजी इलियाससेठ बागवान, हाजी जब्बारसेठ (औरंगाबाद) डॉ.करीम सालार (जळगांव), अस्लमभाई बागवान, सचिव मकसुद बागवान, पोलीस आयुक्त पुणे डॉ.के.व्यंकटेश, संपादक इरफान सर (सोलापूर), जळगाव येथील हाजी अशपाक निसार, शहाद्याचे माजी उपनगराध्यक्ष युनुस युसुफ बागवान आदी उपस्थित होते. जावेद बागवान हे गेल्या वीस वर्षापासून तायक्वांदो स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांनी विद्यापीठ ते राज्यस्तरापर्यंत खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे. कार्यक्रमास उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडीसा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून बागवान व राईन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.