नवापूर । नवापुर तालुक्यातील आंबाफळी (धुळीपाडा) येथे रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. इंडियन नॅशनल फुल गोस्वल चर्चीस फेडपेशन भारत संचलित मंडळातील नवापुर तालुक्यातील एरिया तरुण संघातील युवकांनी एकत्र येेऊन हा कार्यक्रम घडवुन आणला. या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी संस्थेचे अध्यक्ष रेव्ह.बेनहर जे राज व संस्थेचे जनरल सेक्रटरी ,रेव्ह.आर.एम.पटेल हे होते.नंदुरबार जिल्हयाचे माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत व पं.स उपसभापती दिलीप गावीत,पं.स सदस्य जालमसिंग गावीत,कृर्षी उत्पन्न बाजार समिती संचालक नवलसिंग गावीत,नवापुर तालुका कॉग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आर.सी.गावीत, हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश मावची उपस्थित होते.त्यांनी रक्तदान विषयी मार्गदर्शन केले.
रक्तदान करून उद्घाटन
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्ह बिशप बेनहर ने.राज यांनी स्वतः रक्तदान करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी अजय गावीत यांनी आपल्या जिवनातील 39 व्या रक्तदान केले व गताळी गांवातील जयेश गावीत यांनी 26 व्या रक्तदान केले. आमपाडा गांवातील याकुब गावीत यांनी 11 वेळा रक्तदान केले. पं.स उपसभापती दिलीप गावीत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. रक्तदान करण्यासाठी मोठया संख्येत परिसरातील तरुण उपस्थित राहिले. यापैकी 80 युनीट रक्त गोळा करण्यासाठी आयोजकांना यश आले.
यांनी दिली सेवा
आरोग्य तपासणी शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार उपजिल्हा रुगणालय नवापुर येथील डॉ अविनाश मावची,डॉ हरीष कोकणी,डॉ.अजय कुवर,डॉ.अमित मावची,डॉ.अमोल वळवी, डॉ.युवराज पराडके, मनिषा वळवी,,डॉ.किर्तीलता वसावे,डॉ. कांचन वसावे,डॉ.राज भुसावरे,डॉ.अमोल कटारिया,डॉ.इंद्रसिंग वळवी,डॉ.विनु वसावे आदी डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी आरोग्य सेवा पुरविली. सुत्रासंचालन व आभार प्रा. जयराम गावीत यांनी मानले. यशस्वीतेसाठी शंकर मावची,याकुब गावीत,भिमसिंग गावीत,दिलीप गावीत,यांनी परिश्रम घेतले.
रक्तगटाप्रमाणे दात्यांची यादी बनवा
डॉ. अविनाश मावची यांनी रक्तदान ही काळाची गरज आहे म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान सारख्या पवित्र कार्यास सहभागी व्हावे असे आवाहन केले. यानंतर नवापुर तालुक्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हरीष कोकणी यांनी आरोग्य विभागात ज्या नव-नवीन सेवा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची माहिती दिली. यानंतर पं.स. उपसभापती दिलीप गावीत यांनी तरूणांना मार्गदर्शन केले. माजी जि.प. अध्यक्ष भरत गावीत यांनी प्रत्येक गांवामध्ये व गांवातील पाडयांमध्ये तरुणांनी रक्तदान दात्यांची रक्तगटाप्रमाणे यादी तयार करण्याचे आवाहन केले.