जिंद पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची कसोटी

0

चंदीगड-हरयाणा विधानसभेच्या जिंद मतदार संघाच्या पोटनिवडणुकीला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचाही समावेश आहे. ही जागा राखण्यासाठी कॉंग्रेससह रणदीप सुरजेवाला यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपाचे कृष्ण मिड्ढा, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, इनेलोकडून उमेद सिंह रेढू आणि जजपाकडून दिग्विजय चौटाला यांच्यासह एकूण २१ उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. ३१ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

या पोटनिवडणुकीसाठी १७४ केंद्र बनवण्यात आले आहेत. या केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. १४०० पेक्षा अधिक मतदार या केंद्रांवर आहेत. यांतील प्रत्येक केंद्रावर एक मायक्रो ऑब्झर्वरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वजण केंद्र सरकारचे अधिकारी आहेत. एकूण १,६९,२१० मतदार यासाठी मतदान करणार आहेत.