मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विडंबनात्मक आरती पोस्ट करुन सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘येइयो अंबानी माझे माऊली ये, अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी, अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी, अशी विडंबनात्मक आरतीच त्यांनी ट्विट केली आहे. राफेल करार तसेच नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचे भाजपा नेत्याच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर विडंबनात्मक आरती टाकून सरकारवर निशाणा साधला.
येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!
अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!!
अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी !
डसाल्ट कंपनीचे तयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी।
दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!! pic.twitter.com/LuV2qIo99l— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2018
ही आहे आरती
येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!
अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!!
अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी !
डसाल्ट कंपनीचे तयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी।
दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!
येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!
येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!
अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!!
अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी !
डसाल्ट कंपनीचे तयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी।
दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!
दरम्यान, दारु घरपोच देण्याच्या निर्णयावरुनही आव्हाड यांनी टीका केली. खरतर घरामध्ये वीज, पाणी, रेशन पोहचविण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण, ते त्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे दारू पिऊन टाईट व्हा आणि सगळे विसरा या भूमिकेत आता सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी राजे,संभाजी राजे,तुकाराम महाराज ह्यांचा खोटा इतिहास किंवा बदनामी सर्व शिक्षा अभियान मार्फत केली जात आहे. पुस्तक न तपासता आलीच काशी की जाणून बुजून आणली गेली, महापुरुषांच्या बदनामीला जबाबदार कोण ?, असा सवाल त्यांनी विचारला.