शहापुर – शहापुर तालुक्यातील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी यांच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारीता क्षेत्रात गेली 20 वर्ष उल्लेखनीय कार्य केल्याने जितेंद्र भानुशाली यांचा जीवनदीप पत्रकारिता पुरस्काराने मानचिन्ह देउन आमदार पांडुरंग बरोरा यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष तथा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील,समाजकल्याण न्यासचे सोन्या पाटील, अनिल घोडविंदे, आरपीआय चे राज्याचे उपाध्यक्ष फारूक दळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. भोगवटा प्रमाणपत्र नाही म्हणून मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया थांबवू नये
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ठाणे – केवळ भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही म्हणून मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्वेयन्स) प्रक्रिया थांबवू नये, त्यासाठी मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थाना देखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. विशेष म्हणजे, आव्हाड यांनी ही मागणी केल्यानंतर ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता नगरविकास खात्याने एमएमआरडीए क्षेत्रात मुख्यत्वे ठाणे शहरातही मुंबईच्या धर्तीवर ओसीशिवाय डिम्ड कन्वेयन्सची प्रक्रिया तत्काळ सुरु करावी, अशीही मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.