चिंचवड : ठाणे श्रीरंग नगर येथील श्रीरंग हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय रिदमीक जिम्नॅस्टिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक प्रकारांमध्ये यश संपादन केले. स्पर्धेतील वैयक्तिक व सामूहिक या दोन्ही प्रकारांमध्ये पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेच्या 20 खेळाडूंनी भाग घेतला.
रिदमीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेण्याचे पिंपरी-चिंचवड जिल्हाचे तिसरे वर्ष आहे. आठ वर्षाखालील वयोगटात शर्वरी गुर्जर ने ’रोप’ या प्रकारात रौप्य पदक मिळवले. तर आठ वर्षाखालील वयोगटात समूह स्पर्धेत शर्वरी गुर्जर, संतोष महाबळेश्वरकर, अशी कुलकर्णी, लिषिका झोपे, सई दाणी या संघाला आणि 15 वर्षाखालील वयोगटात समूह स्पर्धेत उर्शिता पानिकर, प्रेरणा धर्मिनी, संस्कृती कान्हे, रिया फुलसुंदर, अदिती अगरवाल या संघाने कांस्य पदक मिळविले.