जिया खान आत्महत्येनंतर ६ वर्षांनी बोलला सुरज

0

मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. आत्महत्या करण्याआधी जियाने लिहिलेल्या सुसाइड नोटवरुन सुरज पांचोलीला आरोपी मानण्यात आलं होतं.

https://www.instagram.com/p/Bp9FzMPgM0T/?utm_source=ig_embed

आज मी वयाची २८ वर्षे पूर्ण केली आहेत. यादिवशी मी माझ्या आयुष्यात आलेले काही कटू अनुभव मांडत आहे. मी खूप संयमाने आणि सन्मानाने गेल्या ६ वर्षांपासून न्यायालयात केस लढत आहे आणि या केसची ट्रायल संपण्याची वाट पाहत आहे. या सर्वादरम्यान अनेकदा मला खूनी आणि गुन्हेगार म्हणून संबोधलं गेलं. दररोज मी माझ्याचबद्दलच्या अशा कितीतरी बातम्या वाचल्या आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, तरीही मला आणि माझ्या जवळच्या लोकांना हे सर्व वाचून खूप दु:ख व्हायचे. एखाद्याला काही नावं देणं खूप सोपं असतं मात्र, स्वतःला निर्दोष सिद्ध करणं खूप कठीण असतं. मी नेहमीच माझ्या आई वडिलांना माझा अभिमान वाटावा यासाठी एक चांगला मुलगा होण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला गेल्या ६ वर्षांत खूप मेहनत घ्यावी लागली. यासर्वात जे माझ्या पाठिशी उभा राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे म्हणत सुरजने सोशल मीडियावर ९ नोव्हेंबरला आपल्या वाढदिवशीच पोस्ट शेअर केली.