जिया खान आत्महत्येपूर्वी महेश भट्टजवळ काम मागण्यास आली होती

0

मुंबई: दिग्दर्शक महेश भट्ट यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जिया खानबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या आगामी ‘द डार्क साइट ऑफ लाईफ : मुंबई सिटी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान त्यांनी एक खुलासा केला.

महेश भट्ट म्हणाले, जिया खान आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्याकडे काम मागण्यास गेली होती. पण त्यावेळी ते कुठल्याही प्रोजेक्टवर काम करु शकले नाही. त्यानंतर काही दिवसानंतरच जियाच्या आत्महत्येची बातमी मिळाली, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले.

महेश भट्ट यांची मुलगी शाहीन ही नेहमी लाइमलाईटपासून दूर राहते. यावेळी तिच्याबद्दलही महेश यांनी खुलासा केला, की तिनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शाहीन ही डिप्रेशनमध्ये गेली असता हे पाऊल तिने उचलले. त्यावेळी ती केवळ १३ वर्षांची होती, असे त्यांनी सांगितले.