शहादा। शहादा नगरपरिषद हद्दीतुन पाटबंधारे विभागाची पाटचारी जाते डोंगरगाव रस्ता ते शिरुड चौफुली पर्यंत सुमारे चार किलोमिट्ऱ रुंदीचे पाटचारी जाते.
या पाटचारीत आठ ते दहा फुट गाळ साचला होता तो गाळ काढ्ण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले असुन आज सकाळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यानी एक किलोमिटर पायपीट करीत कामांची पाहणी केली.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
डोंगरगाव रस्ता ते शिरुड चौफुली पर्यंत पाटचारी गेल्या अनेक वर्षापासुन साफ सफाई केली नसल्याने त्यात प्लास्टिक सडलेला भाजीपाला, घरातील सांडपाणी,गटारीतील घाण पाटचारीत सोडले जाते त्यामुळे नागरिंकांचे आरोग्य धोक्यात आले होते. शहादा नगरपरिषद नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यानी पाटचारीची पाहणी करीत स्वच्छतेचे नियोजन केले.ब्रम्हसृष्टी भाजीमंडई, सप्तशृंगी मंदिर लागुन नवा प्रकाशा रोड ,साईबाबा मंदिर लागुन आनंद नगर येथून पाटचारी शिरुड चौफुली होत पुढे निघतो.त्याचा स्वछतेचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे.
घाण, गाळ जेसीबीने काढण्याचे काम सुरु
गेल्या तीन दिवसात एक किलोमीटर लांबीच्या पाटचारीत असलेली घाण गाळ चारा जेसीबी ने काढण्याचे काम सुरु आहे. पाटचारीचे स्वच्छ करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. डॉ.कलशेट्टी यानी पाटचारी पालिका हद्दीत नसल्याने आर्थिक तरतुदीस अडचण असले तरी पालीका प्रशासनाने खर्चास मंजुरीसाठी पाठवावी व पाटचारीतील गाळ निघाल्याने शेतकरी व इतर बंद कुपनलिकां सुरु होतील. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर,डॉ.टाटीया ,तहसीलदार मनोज खैरनार , मुख्याधिकारी सुधीर गवळी, जि. प. सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संदिप पाटील, नाना निकम, संजय साठे, संतोष वाल्हे, चंद्रकांन्त पाटील ,शहादा सर्कल परदेशी, पालिका आरोग्याचे चव्हाण उपस्थित होते.