जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजित भांडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.