जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घेतले व्यास महाराजांचे दर्शन

0

यावल- जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक जळगाव दत्तात्रय शिंदे हे यावल येथे गणेशोत्सव, मोहरम व दुर्गोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी वेदमहर्षी श्री व्यास मंदिरात जाऊन व्यास नारायणांचे दर्शन घेतले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी व फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले उपस्थित होते. उपस्थितांनी मंदिराची संपूर्ण पाहणी केली.

इतिहासातील नोंदीची जिल्हाधिकार्‍यांनी जाणली माहिती
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना प्रा.एस.के.बावस्कर यांनी काशीनंतर भारतामध्ये यावल येथे वेदमहर्षी श्री व्यास यांचे मंदिर असलचे सांगत दंडकारण्य इतिहासात नोंद असून महर्षी व्यासांनी याच ठिकाणी महाभारताचे काही पर्व लिहिल्याचे सांगत व्यासांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व्यास नगरीस अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही सांगितले. याप्रसंगी चंद्रकांत येवले यांच्याहस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर अधिकार्‍यांना व्यसनाची प्रतिमा व पुस्तक सप्रेम भेट देण्यात आली. यावल नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मुकेश येवले, पुजारी भूषण, किशोर माळी सोनू गायकवाड, माधवराव निंबाळकर, शिवाजी फडतरे, किशोर येवले, गणेश कोल्हे, तुषार येवले, अजय येवले, पप्पू सूर्यवंशी, देविदास चव्हाण, आनंद चव्हाण उपस्थित होते.