जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून मोर्चा : धरणगाव पोलिसात मोर्चेकर्‍यांविरोधात गुन्हा

धरणगाव : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढल्याप्रकरणी 20 ते 25 जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

जमावबंदी आदेशाचे उल्लंघण
जळगाव जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जा.क्र. दंडप्र/ 1/कावि/ 2022/2/ 128, दि. 9 डिसेंबर 2022 अन्वये दि. 10 डिसेंबर 2022 ते दिनांक 24 डिसेंबर 2022 पावतो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 37 (1) (3) चे आदेश (जमावबंदी आदेश) लागू केले आहेत. असे असतांना देखील पाळधी दुरक्षेत्र येथे पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढून जमाव पाळधी दुरक्षेत्र येथे आणून शासकिय कामात अटकाव आणला म्हणून शेख सलीम शेख गनी कुरेशी, समद अब्दुल रहमान शेख (दोघं रा. पाळधी ता. धरणगाव) यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अरुण निकुंभ करीत आहेत.