जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई
पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे : रावेरात टेंट व मंगल कार्यालय चालकांची बैठक
रावेर : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर शहरातील टेन्ट हाऊस व मंगल कार्यालय मालकांची तसेच आठवडे बाजार ठेकेदार यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेश्याचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रावेर पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलिस पाटील, टेन्ट हाऊस/मंगल कार्यालय मालकांची तसेच आठवडी बाजारचे ठेकेदार यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याबाबत तसेच अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना व 20 पासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यााबाबत सूचना करण्यात आल्या. कोरोना नियमावलीचे पालन करून घरच्याघरी शास्त्रोक्त पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने विवाह करावेत तसेच नोंदणीकृत विवाहासाठी जास्तीत-जास्त 20 व्यक्तींनी तसेच सर्व धार्मिक स्थळी पाच पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील तसेच सर्व दुकाने वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात दरम्यान सुरू राहतील, अशा सूचना करण्यात आल्या. सीआरपीसी 149 ची नोटीस याप्रसंगी संबंधितान देण्यात आली.कोणत्याही कार्यक्रमात गर्दी होणार नाही व शासनाने निर्गमित केलेले नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.