जळगाव । अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय उपक्रमातंर्गत वातावरण निर्मितीसाठी शहरातील क्रीडा संकुल परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नेदरलँड येथील पर्यटक आयेशा, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूक शेख, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, सचिव मनीष पात्रीकर, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, विलास जैन आदी उपस्थित होते.