जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते योजनांचा शुभारंभ

0

शहादा। पुरुषोत्तमनगर ता. शहादा ग्रामपंचायत व सातपुडा साखर कारखाना यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते विविध योजनाचा शुभारंभ करण्यात आला. पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.

याप्रसंगी सातपुडा साखरकारखाना चेअरमन दीपक पाटील, प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी महारु पाटील, तहसीलदार मनोज खैरनार ,नगरपालिकामुख्याधिकारी डॉ. सुघीर गवळी, जि.प. समाज कल्याण सभापती आत्माराम बागले, कमला पाटील, सरपंच ज्योती पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक पि. आर. पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा. चेअरमन जगदीश पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीसुनिल सखाराम पाटील,दुध संघाचे चेअरमन रविंद्र राऊळ, उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, समनवयक मकरंद पाटील कारखान्यचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाय फाय सेवा उपलब्ध
कॅशलेश व्यवहारसह इतर आवश्यक सुविधा त्वरीत मिळावी म्हणून वाय फाय सेवा उपलब्ध केली. ग्रामपंचायत कार्यालयसह आवश्यक ठिकाणी सी. सी. टि. व्ही. कॅमेरे लावलेत.पुरुषोत्तम कल्पवृक्ष रोपवाटिकेतुन मोहिदा त. ह. मलोणी या ग्रामपंचायतीना मोफत रोपे वाटप केलीत.