जिल्हाध्यक्षपदी शालीक पवार यांची निवड

0

जळगाव । भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे लाडवंजारी मंगल कार्यालय परिसरात विभागीय आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी जिल्हाअध्यक्षपदी शालीक पवार ,जिल्हा शहर अध्यक्ष सुरेश भाट,जिल्हा सचिव संदीप घुगे, जिल्हा शहर उपाध्यक्ष अनिल जोशी, ग्रामीण उपाध्यक्ष किशोर सानप, जिल्हा शहर सचिव भूषण लाडवंजारी,जिल्हा शहर सचिव सुनील लाड,जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे रावेर प्रमुख संजय घुगे यांची निवड करण्यात आली.

17जून रोजी उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक
निवड प्रसंगी भटके विमुक्त हक्क परिषद अंतर्गत येणार्‍या विविध जाती याच्या हक्का लढणे तसेच समाजपयोगी कार्यक्रम राबवणे असे अनेक ठराव या वेळी कारण्यात आले. आगामी 17 जून रोजी भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे उत्तर महाराष्ट्र स्तरीय बैठक घेण्यात येणार आहे असेही ठरले. यशस्वीतेसाठी धनंजय पालवे,सुनील जाधव,संदीप मोरे,भूषण लाडवंजारी ,मनोज गवळी,सुनील पंजे,जोगी,प्रभाकर गायकवाड,निलेश चव्हाण ,संजय घुगे आदींनी कामकाज पाहिले.