जळगाव। जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात व स्वयंस्फुर्तीने विद्यार्थ्यांसह अबाल वृद्धांनी सहभाग घेवून साजरा करण्यात आला. यात तालुकापातळीवरील शासकिय, निमशासकिय, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकिय क्षेत्रांतील प्रत्येकाने योगा करण्यास सहभाग घेतला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगा, प्राणायामावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित योगासने करावी. ध्यान, धारणेला प्राधान्यक्रम द्यावा, असा सल्ला योगशिक्षकांकडून या कार्यक्रमात आवर्जून देण्यात आला.
भडगावात शिस्तबद्ध योगा
भडगाव । तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालय तसेच वडजी येथील टी.आर. पाटील विद्यालयात सकाळी 7 वाजता सुरुवातीला योग करण्यासाठी शरिर आणि मनाची तयारी करण्यात आली. उभे राहून आणि बसून दोन्ही प्रकारची योगासने करण्यात आली. ताडासन, वृक्षासन, शवासन, भुजंगासन अशी सर्वच योगासने मुलांनी आणि शिक्षकांनी शिस्तबद्ध आणि नियमानुसार केली. हि सर्व आसन ए.एस. पाटील यांनी करून दाखविली. हि आसने करण्यासाठी सर्वानी चटई , पट्या घरुन आणलेल्या होत्या. मुलांनी उस्फूर्तपणे योगा करून सर्व योगासनांचा आनंद घेतला. शेवटी ध्यान धारणा, प्रार्थना, संकल्प राकेश पाटील यांनी मुलांकडून करून घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.जे. सावंत, एस.बी.पवार, बी.वाय.पाटील, जे.एस.पवार, एस.जे.पाटील, ई.एम.पाटील यांचेसह सर्वशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद विद्यालयात व महाविद्यालयात योगासनाचे धडे
चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयातील सर्व विभागात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. योग दिनाचे महत्व विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रंजना दंडगव्हाळ, उपशिक्षक जावेद तडवी, प्रतिभा वाघ यांनी विद्यार्थांना सांगीतले. तर विद्यार्थांनकडून योगासने उपशिक्षक अनिल शिंपी, नरेंद्र महाजन, अभिषेक शुक्ल, मनोज पाटील यांनी करून घेतले सुत्रसंचलन उपशिक्षक संजय सोनवणे, कल्पेश सांळुखे यांनी केले तर सुंदर फलक लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व विभाग प्रमूख नरेंद्र भावे, रंजना दंडगव्हाळ, जेनिफर मथायस, योगिता केंगे सह सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
घोडेगाव येथे जागतिक योग दिन साजरा
चाळीसगाव । जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळा, घोडेगाव येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना विविध आसने शिकविली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत बुधा चव्हाण, उपाध्यक्ष रविंद्र जाने, समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी.के. पाटील, भास्कर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विनय राठोड, गौरव परदेशी, प्रदीप पवार, लहु जाधव, बाबासाहेब कुदनर, राजेंद्र पाटील, विजय माळी, चेतना निकम, कविता वाघ, अनिता गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
चोपडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
चोपडा महाविद्यालयात विद्यापीठाच्या आदेशानुसार राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास व क्रीडा विभागाचे वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून पुणे येथील पतंजली योग समितीच्या प्रमाणीत योगप्रशिक्षिका आदरणीय नीनाताई पाटील, तहसीलदार दिपक गिरासे ऊपस्थीत होते. आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मनूष्याला आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावातून मुक्त होण्यासाठी योग आभ्यास व सराव आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एम.बागुल यांनी केले. सुत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.एम.रावतोळे यांनी केले. याप्रसंगी विचारपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी याचेसह विविध शाखांचे उपप्राचार्य जूनियर विभागाचे पर्यवेक्षक इत्यादी उपस्थीत होते. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योगप्रशिक्षिका नीनाताई पाटील यांनी आपल्या योग कलाअविष्काराने उपस्थीत सर्वांचे मने जिंकली. त्यांचे सोबत योग शिक्षक डि.जी. चौधरी व पंकज चौधरी यांनी योगसरावासाठी सहकार्य केले.
गायकवाड माध्यमिक विद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन
अमळनेर । शहरातील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात आतंराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगा शिक्षक आर.बी.चौधरी व जे.एन.करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना योगा शिकवून आपल्या जिवनातील महत्त्व व शारिरीक रोगा पासून मुक्तता कशी करावी यांचे महत्त्व सागंण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक ए.व्ही.नेतकर सरचिटणीस डी.डी.पाटील, पर्यवेक्षक एस.सी.तेले, क्रिडा शिक्षक एन.डी.विसपुते, शिक्षक, शिक्षेका, शिक्षेकेत्तर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
एरंडोल येथे योग दिन साजरा
एरंडोल । येथील ग्रामिण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर व गोपी गोल्ड इंग्लिश स्कुल जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी एरंडोल येथील योगशिक्षक पी.ओ.बडगुजर यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस योगशिक्षक बडगुजर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांनी गुलाब पुष्प देऊन केला. विद्यालयाच्या पटांगणावर उन्नती माध्यमिक तसेच गोपिगोल्ड शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे शिक्षक एस.एच.पाटील, एच डी.पाटील, ए.आर.पाटील, एस.डी.मराठे, बी.पी.पाटील, एस.के.शेटे, सविता पाटील, ए.बी.ठाकूर तसेच गोपिगोल्ड स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.