जळगाव । दिवसेंदिवस अवैध धंद्यांना उत आले आहे. पोलीस प्रशासनातर्फे कारवाई सुरु असून देखील अवैध धंदे बंद होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यउत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू बनावट मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगाव तालुक्यात विविध ठिकाणी बुधवारी 22 रोजी कारवाई करून 16 जणांवर गुन्हे दाखल केलेे. तर आरोपींना ताब्यात घेतले असून लाख 25 हजार 261 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या नेतृत्वात उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध गावठी दारू पाडणार्या अड्ड्यावर धाड टाकली. यात चार तालुक्यांतील 16 जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली तर 11 ठिकाणी मुद्देमाल जप्त केला.
7 हजार 990 लिटर रसायन जप्त
अवैध गावठी दारूचे नदीकाठावरून 7 हजार 990 लिटर रसायन जप्त केले आहे. हातभट्टीची 242 लिटर गावठी दारू, 13.94 लिटर देशीदारू आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील भोलाणे शिवार, भादली बु., खेडी, चाळीसगाव येथे सांगवी शिवारात, भुसावळ तालुक्यात गोजोरे, गोद्री, सुनसगाव, कुर्हा, मुक्ताईनगर येथे कर्की, पुरनाड येथे विविध भरारी पथकांनी धाडी टाकून कारवाई केली. कारवाईत जप्त केलेल्या बनावट मद्याचा साठा रसायन ड्रममधून निकामी करण्यात आले. ही कारवाई निरीक्षक एन.बी. दहिवडे, एस.के. कोल्हे बी.एन.वाणी, नरेंद्र पाटील, अजय गावंडे यांनी कारवाई केली.