जिल्हामार्गास मान्यता

0

रोहा : रायगड जिल्हयातील 10 इतर जिल्हा मार्ग रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली असून यामुळे रायगड जिल्हयातील प्रमुख जिल्हा मार्गांच्या लांबीत 140.05 किमी वाढ झाली असून एकूण लांबी 882.99 किमी झाली आहे.