यावल ( प्रतिनीधी ) जिल्हास्तरीय रोलरबाँल स्केटिंग स्पर्धा गुरूवार दि.१४ रोजी भगीरथ इंग्लिश मिडीयम स्कुल जळगाव येथे संम्पन्न झालेल्या स्पर्धेत किनगाव तालुका यावल येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथील १४ वर्षा आतील खेळाडूंनी उत्कृष्ठ प्रदर्शन करत चावरा इंग्लिश स्कूलच्या संघाला ५-० ने तर लाँर्ड गणेशा स्कूलचा अंतीम सामन्यात १-० ने पराभव करत विभागीय रोलरबाँल स्केटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले विजयी खेळाडूंना काेच तुषार सैतवाल इंग्लिश मिडीयम स्कूल किनगावचे क्रिडा शिक्षक व यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी सर्व खेळाडूंचे यावल तालुका क्रीडा अधिकारी सुजाता घुलाने मॅडम हाँलीबाँल प्रशिक्षक राजेंन्द्र चौहान इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व्हा.चेअरमन सौ.शैलेजाताई विजयकुमार पाटील सचिव मनिष विजकुमार पाटील व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव रोलरबाँल स्केटिंगचे प्रशिक्षक विशाल मोरे इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.